Header Ads Widget

पोलीस महासंचालकाचे माजी कायदेशीर सल्लागार यांचा अमृत महोत्सवी गजानन चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा --

नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे 
पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग, मुंबई महाराष्ट्र राज्याचे माजी कायदेशीर सल्लागार तथा माजी जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील पुणे, पोलीस संचालक पुणेचे कायदेशीर सल्लागार तथा महाराष्ट्र राज्य सरकारी वकील संघटनचे माजी अध्यक्ष श्री. गोविंदराव गणपतराव देगावे यांचा ७५  वा अमृत महोत्सव वाढदिवस गजानन चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला आहे 

देगावे साहेब हे मूळचे धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथील आहेत. त्यांनी यशवंत कॉलेज नांदेड येथे बी एस सीची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले नंतर त्यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून एल एल बीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी पुढील एल एल एमची पदवी पुणे विद्यापीठातून केली छोट्याश्या खेड्यातून शिक्षण घेत त्यांनी उच्च पदा पर्यंत भर्रारी मारली आहे 

डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून  एल एल बी ची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी १९७७ ते १९८२ मध्ये माजी विरोधी पक्षनेते तथा शेकापचे नेते दत्ता पाटील यांच्या सोबत खाजगी वकिली केली मग त्यांनी १९८२ ते २००६ पर्यंत जिल्हा न्यायालय पुणे येथे सरकारी वकील म्हणून काम पहिले. त्यात त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं मोठ्या केसेस लढल्या अन जिंकल्या आहेत 

ते नात्याने माझ्या आईचे मामा आहेत माझ्या आजोबांचा स्वभाव अत्यंत शिस्तप्रिय, प्रेमळ अन निस्वार्थी. त्यांनी गावाकडे आल्यावर सगळया परिवारासह नातेवाईकां कडे भेट देऊन मनमोकळ्या गप्पा करतात आज त्यांच्या धावत्या दौऱ्यामध्ये त्यांचा अमूल्य वेळ घेऊन त्यांच्या सोबत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे

त्यांनी वकिली करत असताना लढलेल्या लढाया सांगितल्या, विविध किस्से सांगितले, त्यांना आलेला अनुभव, अन प्रशासनातील अनुभवाबद्दल ही त्यांनी भाष्य केले.

दिनांक १३ मार्च २०२३ रोजी त्यांचा पंचाहात्तरावा वाढदिवस. ते योगायोगाने त्यांच्या धावत्या दौऱ्यामध्ये आम्हाला भेटायला आले त्यांनी पुढील कामानिमित्त म्हणून निघणार असताना आम्ही सर्वांनी मुक्काम करण्याचा आग्रह केला आहे

आग्रह स्वीकारून त्यांनी येथेच मुक्काम केला. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाची माहिती होताच आम्ही वाढदिवस करायचं ठरवलं अन तो मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांच्या सहित आम्हाला पन खूप आनंद झाला आला. 

प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, देविदास पाटील मोरे, लोकमत तालुका प्रतिनिधी रामकिशन मोरे, हरिदास पाटील मोरे, बालाजी मोरे अशोक पाटील पवार, माधव पाटील चव्हाण, बाबाराव पाटील भुताळे, साईनाथ पाटील मोरे, शिवानंद पांचाळ, किरण पाटील मोरे, प्रवीण बिरेवार, शिवाजी पाटील चव्हाण, गणेश देगावे, श्रीनिवास देगावे, गणेश चौधरी, सह गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांच्या मित्र मंडळाच्या वतीने खूप मोठ्या उत्सहात साजरा केला.

Post a Comment

0 Comments