तालुक्यातील मौजे दिघी येथील जेष्ठ महिला भाग्यरताबाई दत्ता गायकवाड यांचे दि १० मार्च रोजी दुःखद निधन झाले होते त्या दिघीच्या सरपंच सौ. छाया बंडू गायकवाड यांच्या सासूबाई होत्या तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड यांच्या काकू होत्या
भाग्यरताबाई यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हदगांव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हळहळ व्यक्त करून गायकवाड परिवाराचे दि १२ मार्च २०२३ रोजी सांत्वन केले
यावेळी बोलताना आमदार जवळगावकर म्हणाले कि भाग्यरताबाई यांच्या जाण्याने गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या जाण्याने मलाही दुःख झाले आहे.यामुळे गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी झालो असे ते यावेळी म्हणाले आहे
यावेळी ग्रामसेविका गोनेवार मॅडम,सरपंच सौ. छाया बंडू गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य संजय घुटे, संभाजी शिरफुले, बालाजी वानखेडे, सुनिल वानखेडे, अशोक शिरफुले, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड, बंडू गायकवाड,रवि गाडेकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

0 Comments