Header Ads Widget

आमदाराला विकास कामे करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळतो तर खासदाराला किती ? - जनसामान्याचा प्रश्न !!

        माधव पवार
महाराष्ट्र राज्यातल्या विद्यमान आमदाराला त्यांच्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळतो तर याच राज्यातील विद्यमान खासदाराला आप आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी किती निधी मिळतो ? असा प्रश्न जनसामान्य माणसातून विचारला जात आहे

आमदार असो की खासदार महोदय असो सदरचा निधी हा झाडाला फळे लागल्या सारखा विद्यमान आमदारांना निधी मिळते  तर खासदाराला का मिळत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात असून नायगाव विधानसभा मतदार संघात आलेला तुफानी निधी पाहता खासदाराना किती निधी विकास करण्यासाठी मिळतोय असा प्रश्न चर्चेला जात आहे 

राज्यातील आमदार हे लोकप्रतिनिधी असले तरी खासदार ही लोकप्रतिनिधीच आहेत खासदार हा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून जातो तर आमदार हा विधानसभेच्या निवडणुकीतून निवडून जातो तर मग विद्यमान आमदाराला विकास करण्यासाठी कोठ्या वधी रुपयांचा निधी मिळते आहे

तर खासदारला त्यापेक्षा ही जास्तीचा निधी मिळणे अपेक्षित असतो का कमी निधी मिळतो हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो परंतु सध्याच्या परिस्थित पाहिले तर खासदारा पेक्षा आमदाराला कोठ्यावधी रुपयांचा निधी मिळत असल्याचे वास्तव चित्र जनतेला दिसत आहे 

Post a Comment

0 Comments