विकास आणि विकासाचे महत्त्व कळाल्या शिवाय राजकारणात मजाच नाही विकास हे देश घडविण्याचे काम करते विकास झाला तरच राज्याची व देशाची ग्रामीण भागात विकासाची प्रगती झाली तर राज्य प्रगती पथावर जाईल म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील म्हणतात चला हवा येऊ द्या बॉस एकच ध्यास सबका विकास केल्या शिवाय भविष्यात गप्प बसणार असे पाटील म्हणाले आहे
गावचा विकास रस्त्यावरून कळते तशाच पद्धतीने नायगाव मतदार संघाचा विकास अंतर्गत रस्त्यावरून समजत असल्यामुळे कोण किती श्रेय लढती यावर अवलंबून रस्ताचा विकास नसतो प्रत्यक्षात विकास झाला पाहिजे काल परवाच घुंगरा ते बळेगाव रस्त्याच्या संदर्भात मी जनतेला विश्वास दिला होतानांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सदरचा रस्ता लवकरच मार्गी लावू असे शिवराज पाटील होटाळकर यांनी दैनिक प्रजावाणी व नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले होते
नायगाव तालुक्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये पांदन रस्त्याचे कामे मोठ्या प्रमाणात खोळंबले आहेत त्या प्रमाणात तातडीने मार्गी लावण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी ग्रेट भेट घेणार आहेत या भेटी दरम्यान सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पांदण रस्त्याची कामे व सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील कोणत्याही गावात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून त्या अगोदर पाणीटंचाईच्या संदर्भात प्रशासनाने अतिदक्ष राहण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची काही दिवसातच शिवराज पाटील होटाळकर हे भेट घेणार आहे

0 Comments