Header Ads Widget

भुजंगराव सुर्यवंशी यांची हत्या कि आत्महत्या ? शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार -


धर्माबाद : अनंतोजी कालीदास - 

मौजे बाभळी येथील रहिवाशी तथा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भुंजगराव सुर्यवंशी बाभळीकर वय ३५ वर्ष यांचे तालुक्यातील सिरजखोड येथील गोदावरी नदीत मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आल्यामुळे तालुक्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे.
       
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भुंजगराव नागोराव सुर्यवंशी यांना रविवारी त्यांच्या मित्रांनी शेतात पार्टी करूत म्हणून त्यांना घरून घेऊन गेले होते. रविवार पासून भुजंगराव ऊर्फ छोटू पाटील बाभळीकर घरी परत न आल्यामुळे त्यांची पत्नी राजश्री पाटील यांनी नातेवाईक व छोटू पाटील यांच्या मित्रांकडे विचारपूस करीत माहीती घेण्याचा प्रयत्न केले आहे

तरी सुद्धा माहीती मिळत नसल्यामुळे घरून पतीला घेऊन गेलेल्या मित्रांना फोन लावण्याचा प्रयत्न केल्याने त्या मित्रांचे फोन बंद असल्यामुळे  राजश्री पाटील यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे 

त्यां नंतर पोलिसांनी छोटू पाटील बाभळीकर यांच्या काही मित्रांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यास माहीती मिळाल्याने पोलिसांनी लगेच सिरजखोड येथील गोदावरी नदीच्या परीसरात पाहणी केली असता,छोटू पाटील यांचे मृतदेह पाण्यात सापडले आल्याचे सांगण्यात आले आहे.

छोटू पाटील यांची हत्या कि आत्महत्या याचा तपास पोलीस करीत आहेत. मयत छोटू पाटील बाभळीकर यांचे शवविच्छेदन घटनास्थळीच करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सायंकाळी सात वाजता बाभळी येथे अंत्यविधी करण्यात आले आहे. छोटू पाटील बाभळीकर यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,भाऊ, वडील,आई असा मोठा परिवार आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून छोटू पाटील बाभळीकर गोर गरीब जनतेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेत असल्यामुळे अल्पावधीतच तालुक्यातील जनतेचे ते परीचित झाले होते.

त्यांच्या निधनामुळे बाभळी व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments