Header Ads Widget

नायगाव येथे श्री मार्कंडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलाचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या महिला दिनाचे औचित्य साधून नायगाव येथे श्री मार्कंडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या वतीने मोठया प्रमाणात महिलाचा गळ्यात फुलाचा हार घालून सन्मान करण्यात आला आहे 
तालुक्यातील खेड्यापाड्यात सुद्धा दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सकाळ पासूनच सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती जेष्ठ पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांनी नायागांव फास्ट न्यूज दिली असून त्यांनी असे सांगितले की नायगाव येथे श्री मार्कंडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या वतीने महिला दिनी महिलाचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे 

नायगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या व महिलाच्या सन्मानाच्या अध्यक्ष लक्ष्मण चन्नावार सचिव साईनाथ चन्नावार रामप्रसाद चन्नावार साईप्रसाद चन्नावार शिवकुमार चन्नावार व आदी महिला उपस्थित होते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा ही दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments