Header Ads Widget

जिल्ह्यासह नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात गाराची शेती - प्रशासने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी - शिवराज पाटील

      माधव पवार
जिल्ह्यासह नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात गाराची शेती - प्रशासने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी - शिवराज पाटील अशी मागणी केली आहे 

दिनांक १६ मार्च २०२३ रोजी आकाशात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते त्या ढगाळ वातावरणाचा फटका या तिन्ही तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असल्याने नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतात अखंड गाराची पेरणी केली आहे 

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी मा शिवराज पाटील होटाळकर यांनी केली

जिल्ह्यात अनेक वेळा असे ढगाळ वातावरण निर्माण झाले परंतु अशी शेतकऱ्यांच्या शेतात गाराची पेरणीच झाली नव्हती दिनांक १६ मार्च २०२३ रोजी अवकाळीने जिल्ह्यात धुमाकूळ मजविला यात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस यामुळे भागायतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले टाळकी ज्वारी गहू हरभरा आंब्याचे नुकसान झाले आहे

टरबूजाचे नुकसान सदरच्या आवकाळीने केले असल्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसील प्रशासला पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments