Header Ads Widget

नागार्जुना पब्लिक स्कूलच्या संगीत शिक्षिका सौ. पडोळे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

     
       राजकुमार पाटील मंगनाळे

कै. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात कुसुम महोत्सव साजरा करण्यात आला आहे 

या महोत्सवात विविध क्षेत्रातील गुणवंत महिला यामध्ये नागार्जुना पब्लिक स्कूल नांदेडच्या संगीत शिक्षिका सौ. शिवकांता प्रणव पडोळे संगीत क्षेत्रात आपल्या अतिशय सुमधुर गायनातून श्रोत्यांची मने जिंकत महाराष्ट्रभर नव्हे इतर राज्यातही आपल्या सुमधुर आवाजाची छाप त्यांच्या मंजुळ स्वरातून पाडली आहे

त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांचा कै. कुसुमताई चव्हाण आयोजन समितीकडून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये संगीत क्षेत्रात आपल्या गायनाने नांदेड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा, महाराष्ट्र व राज्याबाहेर आपल्या आवाजाने स्वर निनाद संगीत संचाच्या माध्यमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सौ शिवकांता पडोळे यांना माजी राज्यमंत्री श्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण या कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. अमिता चव्हाण, जया चव्हाण, सुजया चव्हाण, श्री अमरनाथ राजुरकर सह अनेकांची उपस्थिती होती.

गायिका सौ. शिवकांता पडोळे यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल शाळेचे प्राचार्य सौ. शैला पवार, संचालक श्री केशव गड्डम, प्रदीप पवार, सत्यनारायण शिवनी, पत्रकार राजकुमार पाटील मंगनाळे, सर्व कर्मचारी वृंद व संगीत क्षेत्रातील जानकारांनी यांचे कौतुक केले.


Post a Comment

0 Comments