Header Ads Widget

हिमायनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस विजेचा कडकडात आवकाळीचा धुमाकूळ !!


हिमायतनगर  : नागोराव शिंदे 

हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांडा जिल्हा नांदेड  येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला तर आकाशात विजेच्या कडडाट होऊन तुफानी पाऊस पडला असल्याचे व्रत असल्याने या या भागातील शेतकऱ्याच्या शेतातील गहू,तीळ, मक्का,हरभरा ज्वारी यांचे मोठी नुकसान झाले व आवकाळीने नुसता धुमाकूळ माजविला आहे
तालुक्यातील काही भागात आवकाळीने सायंकाळी ठिक ४ वाजून २८ मिनिटा पासून तालुक्याला गारपिटीने झोडपले यात शेतकऱ्याचे शेकडो रुपयाचे नुकसान झाल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी सदरची माहिती दिली आहे 
हिमायतनगर नागोराव शिंदे पळसपुरकर आज दिनांक १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली तालुक्यातील पैनगंगा नदी काठा वरील असलेल्या डोलारी सीरपली एकांबा कोठा तांडा वारंग टाकळी आदी गावामध्ये जोरदार गारपीट झाल्याने शेतातील मका, गहू, हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
गेल्या दोन दिवसापासून आकाशात ढग निर्माण झाले व दिवस भर गर्मी झाली आणि अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाका तालुक्याला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी माजी सरपंच राजू पाटील भोयर सेलोडकर यांनी नायगाव फास्ट न्यूज सी बोलताना व्यक्त केली आहे

हिमायनगर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस विजेचा कडकडात आवकाळीचा धुमाकूळ माजविल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्याने त्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी जोर धरित आहे 

Post a Comment

0 Comments