Header Ads Widget

इतवारा पोलीस ठाण्याच्या हदीतील जुना कौठा गोदावरी पुला वरून उडी मारून मरण पावलेल्या मुलीची ओळख पटविण्याचे - पोलीस निरीक्षक धबडगे यांचे आवाहन -अखेर मुलीची ओळख पटली ती बारडची असल्याचे सांगण्यात येते !!

          माधव पवार
नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या जुना मोंढा ते कोठा जाणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या पुलावर पाण्यात उडी मारुन १४ ते १५ वर्षाची मुलगी मरण पावली असून आहे

सदरच्या प्रेताचा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला परंतु सदरची मुलीची ओळख पटत नसल्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसानी केले आहे
---------------------------------------------------------------------
 "" त्या मुलीची ओळख पटली ती बारडची रहिवासी ""

मुदखेड तालुक्यातील मौजे बारड येथील रहिवासी असलेली नांदेड येथे तिच्या मावशीला भेटण्यासाठी आली होती परंतु मयत शीतल संभाजी वाघमारे ही इतवारा पोलीस ठाण्याच्या हदीतील जुना कौठा गोदावरीच्या पुला वरुन उडी मारून मरण पावली असल्यामुळे सदरील मुलीची ओळख पटविण्याचे - पोलीस निरीक्षक धबडगे यांचे आवाहन केले होते ती मयत मुलगी बारड येथील असल्याचे सांगण्यात येते 
---------------------------------------------------------------------
इतवारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गोदावरी पुला वरुन उडी मारून मरण पावलेल्या मुलीचे पोलीसा मार्फत असे वर्णन देण्यात आले मुलीचे अंदाजे वय १४ ते १५ वर्ष रंग सावळा
अंगात हिरवे टी शर्ट व निळा जीन्स पॅन्ट उंची अंदाजे चार ते साडे चार फूट डोक्याला लांब केस उजवे हाताचे पोटरी वर गोविंद असे गोंदलेले आहे

सदरची घटना दिनांक १८ मार्च २०२३ रोजी उघडकीस आली आहे

सदर मुलगी कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा मुलगी मिससिंग असल्यास पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे मोबाईल नंबर ९५५२५२०३६३ या नंबर वर संपर्क साधावा असे ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे पोलीस ठाणे इतवारा नांदेड यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments