Header Ads Widget

राहेर बरबडा कुंटूर रुई परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले वीट भटी वरील कामगार हैराण -

     माधव पवार
नायगाव तालुक्यातील राहेर बरबडा कुंटूर रुई बु परिसराला दिनांक १८ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ठिक सात वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावासाने चांगले झोडपले तर या भागातील वीट भटीवर काम करीत असलेले कामगार पावसाने हैराण झाले असल्याचे व्रत आहे

तालुक्यातील गेल्या दोन ते तीन दिवसा पासून दिवसाला  वातावरणात बिघाड होऊन आकाशात काळे कुठ ढग निर्माण होत असल्यामुळे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटमुळे शेतकऱ्यांसह वीटभटी वर काम करणारे मजुर लहान लहान लेकर घेऊन काम करीत असल्यामुळे मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे

राहेर व बरबडा इज्जतगाव रुई बु येथे वीट भटीवर काम करणाऱ्या वीट कामगारांना पावसाचा तडका बसण्याची शक्यता वर्तवली जाते रात्रीच्या वेळी पाऊस पडत असल्यामुळे वीटभटी कामगार छोटे छोटे लेकर घेऊन सुरक्षित ठिकाणी गेल्या असल्याचे सांगण्यात येत सध्याच्या परिस्थित जोरदार अवकाळी पडत असल्यामुळे वीट भटी धारकाची तर नुकसान झालीच परंतु मजूर वर्ग हैराण होत असल्याचे सांगण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments