व्हि पी के उद्योग समूहातील एम व्हि के ऍग्रो फूड प्रॉडक्ट प्रा लि कुसुमनगर वाघलवाडा, डॉ शंकरराव चव्हाण जागरी अँड ऍग्रो प्रॉडक्ट ली वाघलवाडा व व्हि पी के ऍग्रो फुड प्राॅ.प्रा.ली सिंधी या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कळविण्यात येते की ऊस लागवड हंगाम २०२२ ते २०२३ मध्ये कारखान्याच्या उदिष्टाप्रमाणे लागवड कमी प्रमाणात झाली आहे
तरी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणे करीता जास्तीत जास्त लागवड होणे गरजेचे आहे.करीता कारखान्याचे चेअरमन मा. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी कारखाना प्रशासनाने खालील ऊस विकास योजना जाहीर केल्याचे सांगितले आहे.
माहे फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पाकांना एफ आर पी पेक्षा जादा प्रती मे.टन रुपये १००/- प्रोत्साहनपर भाव वाढ देण्याचे ठरवले आहे
व तसेच ज्या शेतकऱ्यांकडे ऊस बेणे उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना उधारी तत्वावर बिनव्याजी स्वरूपात हेक्टरी ०५ मे. टन बेणे देण्याचे जाहीर केले आहे. सदर योजने अंतर्गत ऊस बेणे घेतलेल्या ऊस उत्पादकास प्रोत्साहनपर भाव वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
माहे मार्च मध्ये लागवड केलेल्या ऊस पिकाची लागवड नोंदणी कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेत देणे बंधनकारक आहे.
ऊस लागवड करतांना शिफारशीत असलेल्या ऊस जातींचा वापर करावा जसे को-८६०३२,व्हि एस आय ८००५, एम एस १०००१,को सी ६७१, को एम ०९०५७ सदर योजनेचा
लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी आशी विनंती कारखाना प्रशासनामार्फत करण्यात आली.

0 Comments