महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण त्याच बरोबर श्रीनिवास पाटील चव्हाण विजय पाटील चव्हाण प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण आणि संभाजी पाटील भिलवंडे यांच्या विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा होत आहे
दिग्ज नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या माजी सरपंच बालाजी मदेवाड यांचा भव्य वाढदिवस दिनांक ३ मार्च २०२३ रोजी साजरा होत आहे
तालुक्यातील बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांची राजकीय वर्तुळात ओळख असल्याचे माजी नायगाव पंचायत समितीचे सभापती सौ वंदनाताई मनोहर पवार यांचे प्रतिनिधी मा. प्रचार्य मनोहर पवार यांनी सांगितले आहे बरबड्याचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बालाजी मदेवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीलाताई पाटील यांच्या व्याख्यानासह कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे दिनांक ३ मार्च २०२३ रोजी बरबडा येथील बस स्टँड येथे सदरच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे
बरबड्याचे विद्यमान माजी सरपंच बालाजी मदेवाड हे जनसामान्याचे नेतृत्व असल्यामुळे या जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी व विविध कार्यक्रमाने आयोजित करण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्ध कीर्तनकार तथा व्याख्यान करत्या हभप शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य दिव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सदर कीर्तनाचा जिल्ह्यातील व तालुक्यातील भाविक भक्ताने अवशेष लाभ घ्यावा असे बालाजी मदेवाड मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

0 Comments