नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागा अंतर्गत करण्यात येत असलेल्या पाझर तलावाचे काम व उंची वाढविण्याच काम चालू असल्यामुळे या कामावर लागणाऱ्या मुरूमाचे उत्खलन करण्यात येत आहे
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सदरील कामावर लागणाऱ्या मुरूमाची व रॉयलटी भरली का ? यांची चौकशी करावी अशी जनतेतुन मागणी होत आहे
तालुक्यातील घुंगराळा येथे जिल्हा परिषद लघु पाठबंधारे विभागा मार्फत सदरचे काम गुत्तेदारा मार्फत करण्यात येत असल्यामुळे सदरील तलावाच्या पाळूची उंची वाढविली जात आहे
गुत्तेदारांनी त्या मुरुमावर पाणी अथवा रुलरने दुबई करत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून सदरच्या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा होत असून या ठिकाणी दगडाची ही पिचींग करण्यात येत आहेजिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या तळ्याच्या पाळूवर दगडानी पिचींग करत असले तरी लेव्हल रित्या करण्यात येत नसल्यामुळे येत्या पावसाळ्यात कृष्णुरच्या पाझर तलावासारखी अवस्था निर्माण होऊ नये यांची काळजी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी घ्यावी असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
सदरच्या पाझर तलावाच्या कामावर लागणाऱ्या मुरुमाची गुत्तेदारांनी राहिली रॉयल्टी काढली का ? यांची चौकशी नायगावच्या तहसीलदारांनी करावी अशी मागणी जोर करीत आहे

0 Comments