नायगाव येथे राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठपुरावा कारून सरकार कडून एक कोटी ७२ लाख रुपयाचा निधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता
यातील एक कोटी ५० लाख रुपये निधींच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते ते ते काम सध्याच्या परिस्थित प्रगती पथावर गुत्तेदार पवार यांनी चालू केले आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा मंदिर परिसरात राज्य शासनाच्या वतीने पर्यटन व तीर्थक्षेत्र या विभागा मार्फत प्रादेशिक पर्यटन विकास योजना या योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री कु. आदीतीताई तटकरे यांनी मंजूर केला होता
घुंगराळा येथील पोलीस खात्याचे बिनतारी संदेश केंद्र या कार्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गृहमंत्री मा. अनिल देशमुख ,व मा. दिलीप वळसे पाटील यांच्या शिफारशीनुसार तत्कालीन बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत ४० लक्ष रुपये इमारत दुरुस्ती करण्या करिता मंजूर केला होता
राज्य शासनाच्या सामाजीक न्याय खात्याचे तत्कालीन मंत्री मा. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या दलित वस्ती सुधार योजना या योजनेतून घुंगराळा येथील दलित वस्तीत सी. सी. रोड, नाली बांधकाम याकरिता सात लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे

0 Comments