राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस असताना ग्रामीण भागात अवकाळा का ? आली असा प्रश्न जनसामान्य जनतेतून विचारला जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर पाटील भिलंवडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्याक्ष विश्वानाथ बडूरे यांनी पक्ष बळकटीसाठी लक्ष देण्याची आवश्यकता भासत आहे
आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकी बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी नेते मंडळी सहकार्यकर्ते पेटून उठणार का ? असा सवाल ही जनतेतून केला जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये दिग्गज नेते मंडळी आहेत कंधार लोहा विधानसभेचे माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांचे राजीनामे दिले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने काम करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे यांच्यासह कार्यकर्ते व्यक्त केले आहे
मागील काही वर्षाखाली माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर तसेच नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिट्टी देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच मरगळ आली होती परंतु शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष राज्यात युती करून सरकार स्थापन केले होते
सदरची पडझड भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पेटून उठावेच लागेल असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments