Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या लाडक्या मेहुण्याला तुळजाभवानी जिनिंगच्या निवडणूकीत दे धक्का श्रावण पाटील भिलवंडे गटाचे १३ तर माजी मंत्री खतगावकराचे दोन उमेदवार विजयी !!

       माधव पवार
निवडणुका कोणत्या ही असो लोकसभेच्या असो की विधानसभेच्या असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असो ग्रामपंचायतच्या असो की सेवा सहकारी सोसायटीच्या असो या सदरच्या निवडणुकी मध्ये अटीतटीचे निवडणूका व गट असतातच या अशीच एक निवडणूक नरसी येथे तुळजाभवानी जिनिंगच्या माध्यमातून घेण्यात आली या निवडणुकी मध्ये श्रावण पाटील भिलवंडे गटाने बाजी मारली आहे
नरसी येतील तुळजाभवानी जिनिंगच्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या लाडक्या मेहुण्याला सदरच्या निवडणूकीत दे धक्का बसला आहे

नायगाव तालुक्यातील नरसी तेथील श्री तुळजाभवानी जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेची निवडणूक प्रदिर्घ काळानंतर घेण्यात आली सदरची निवडणूक दिनांक २१ मार्च २०२३ रोजी पार पडली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री तथा मा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गटाची व भाजपा पक्षाचे श्रावण पाटील भिलवंडे यांच्या गटात पार पडली आहे 
या निवडणुकीत भिलवंडे गटाचे गटाचे १३ उमेदवार तर खतगावकराचे दोनच उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती मिळते आहे

तुळजाभवानी जिनिंगच्या निवडणुकीत बिनविरोध झालेले भाजपा प्रणित पॅनलचे श्रावण शंकराव भिलवंडे मोहन गोविंदराव भिलवंडे बालाजी चिंतावर सचिन भगवानराव बेंद्रीकर अशोक व्यंकटराव पाटील भिसे नारायण खनपट्टे बालाजीराव शेळगावकर वसंतराव शरणाप्पा कस्तुरे व्यंकटराव कोकणे पद्मिनीबाई रामचंद्र बुक्के सरोज आनंदराव बावणे शिवराज भाऊराव पवार असे एकूण भाजपाचे श्रावण पाटील भिरवंडे यांच्या गटाचे तेरा उमेदवारांनी जोरदार बाजी मारली तर मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर पाटील गटाला दोनच जागेवर समाधान मानावे लागले आहे 




Post a Comment

0 Comments