Header Ads Widget

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना लाभार्थ्यांच्या अडचणीवर त्वरित मार्ग काढा - संबंधित अधिकाऱ्याना प्रा.रवींद्र चव्हाण यांची सूचना !!

        माधव पवार
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना लाभार्थ्यांच्या अडचणीवर नायगावच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल वाजे त्वरित मार्ग काढावा अशा पद्धतीच्या महत्वाच्या सुचना प्रा.रवींद्र चव्हाण यांनी दिनांक २१ मार्च २०२३ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव येथे चव्हाण यांनी दिल्या आहेत
गेल्या अनेक वर्षा पासून व महिन्या पासून नायगाव तालुक्यातील कोणत्याच ठिकाणी रोजगार हमी योजनेचे कामे चालू नसल्यामुळे व मजुराच्या हाताला काम नसल्यामुळे मजुरावर उपवास मारीची वेळ येत असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी सदरचे काम चालू करावे असे यावेळी युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी अधिकाऱ्याना सुचविले आहे
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अडचणीवर  गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या सोबत सविस्तर चर्चा  केली.योजनेच्या मस्टर मागणीवर ग्रामसेवक स्वाक्षरी करत नाहीत व ग्रामसेवकाची स्वाक्षरी असल्याशिवाय गटविकास अधिकारी मस्टर वितरित करण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे नायगाव तालुक्यातील सर्व सिंचन विहीर व जनावरांच्या गोठ्यांचे लाभार्थीयांना पंचायत समिती येथे वारंवार खेटे मरावे लागत आहेतत्यांच्या अडचणीं सोडविण्यासाठी गट विकास आधिकारी व  ग्रामसेवक संघटना पदाधिकारी यांची संयुक्तिक  बैठक घेऊन होणाऱ्या जनतेच्या वरील आडचणीवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी विचारणा केले. त्यावेळी टी.जी. पाटील रातोळीकर यानी. शाषन निर्णय वाचुन दाखवत  मष्टर मागणी व मस्टर यावर ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता नसून ग्रामरोजगासेवक व जे ई तांत्रिक कर्मचारी यांच्या संयुक्त सहीने मस्टर काढावेत असा  जी आर संघटना सचिव सुर्यकांत बोंडले  यांनी  निर्दशनात आणुन दिले
त्यावेळी मा. गटविकास अधिकारी साहेब यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून दोन दिवसात मार्गदर्शन मागून वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे मस्टर काढले जातील व अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जातील असे आश्वासन  दिले.  दालनामध्ये प्रा.रवींद्र चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण व संजय आप्पा बेळगे यांनी सविस्तर चर्चा केली.ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या चर्चेअंती लाभार्थ्याच्या मस्टरवर स्वाक्षरीच्या संदर्भात त्वरित दोन दिवसात  मार्ग काढण्याच्या अनुषंगाने सकारात्मकता सुचना रविंद्र पाटील यांनी देऊन  लवकरात लवकर मार्ग काढून लाभार्थ्यांना त्यांचा मोबदला त्वरित मिळवून देण्यात  यावा असे सांगीतले आहे 

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जी.पाटील रातोळीकर,सुर्यकांत बोंडले सचिव , रविराज नव्हारे मानदआध्यक्ष , नागेश  यरसनवार उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना नायगाव  सह बाबासाहेब शिंदे, पत्रकार मनोहर तेलंग तिजारे पाटील, धोंडजी पाटील बेंद्रीकर शंकर मालीपाटील ,रावसाहेब पाटील शिंदे इत्यादी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments