माधव पवार
भोकर पोलीस ठाणे :- भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी २५००० हजार रुपयाची लाच लाच मागितल्या प्रकरणी व स्वीकारल्या प्रकरणी दिनांक २१ मार्च २०२३ रोजी लाचलुचपात प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या यशस्वी सापळा कारवाईत आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष लोभाजी कदम ४८७ पोलीस स्टेशन भोकर यांना नांदेड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले असल्याची माहिती मिळते आहे
समोरील :- पार्टीच्या तक्रारी वरून दाखल एन. सी. चे तपासात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या बहिण व नातेवाईक यांचे विरुध्द दाखल एन. सी. मध्ये मदत करतो आणि तक्रारदार यांचे बहिणीचे फिर्याद वरून दाखल गुन्ह्यात सुध्दा मदत करतो म्हणुन आरोपी लोकसेवक यांनी पंचविस हाजार रुपयाची मागणी केल्या प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले
पोलीस ठाणे किनवट : सदर गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले म्हणुन व यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक
बालासाहेब नरोबा पांढरे यांनी तक्रारदार यांना दहा हाजार रुपये लाचेची मागणी करून पाच रुपये या पूर्वीच स्विकारले व उर्वरित पाच दिनांक २० मार्च २०२३ रोजी घेऊन येण्याचे सांगितले होते आणि लाच लुचपत अधिकाऱ्याच्या सापळ्यात रंगे हात पकडे होते
पोलीस स्टेशनं भाग्यनगर : आरोपी शिवाजी रामकिसन कानगुले व्यवसाय नौकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल २४६१ पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड राहणार लातूर फाटा नांदेड तक्रार प्राप्त दिनांक १४ मार्च २०२३ लाच मागणी पडताळणी १४ मार्च लाच स्विकारली १४ मार्च लाचेची मागणी रक्कम १८०० रुपये स्विकारली रक्कम १८०० रुपये तक्रारदार यांच्याकडे कामाला असलेल्या मुला कडून किरकोळ अपघात झाला होता त्यावेळी लाचेची मागणी केळी त्यावेळी अटक झाले होते
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजेंट यांनी कोणते ही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन सदरच्या अधिकाऱ्यानी व कर्मचाऱ्यांनी केले आहे

0 Comments