Header Ads Widget

इकळी माळ येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राम जन्मोस्तव ,अखंड हरिनाम सोहळ्याला सुरुवात महाराष्ट्रातील नांमवन्त कीर्तनकार व कलावन्त यांची हजेरी !!

विशेष प्रतिनिधी  : बाळासाहेब पांडे :- 

श्री संत परबतेश्वर महाराज यांची ४४ वी पुण्यतिथी, मुर्तीस्थापनेचा प्रथम वर्धापण दिन श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त मौजे ईकळीमाळ ता. नायगांव जि.नांदेड येथे आज गुढी पाडवा पासून अखंड हरिनाम सोहळ्याला सुरुवात होत असून या निमित्त दररोज महाराष्ट्रातील नांमवन्त कीर्तनकार यांची हजेरी लागणार आहे
    
मि. चैत्र शु. प्रतिपदा (गुढीपाडवा) शके १९४५ से मि चैत्र शुद्ध दशमी दि. २२-३-२०२३ बुधवार ते दि. ३१-३-२०२३ रोज शुक्रवार पर्यंत हा अखंड हरिनाम सोहळा साजरा होणार आहे कलश व विना पूजन करून सप्ताह प्रारंभ होणार आहे.
श्री संत परबतेश्वर महाराज समाधी मंदीर ईकळीमाळ ता. नायगांव जि. नांदेड येथे प्रतीवर्षा प्रमाणे यंदाही श्री संत परवतेश्वर महाराज यांची ४४ वी पुण्यतिथी व मुर्ती प्राण प्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन व तसेच श्रीराम जन्मोत्सव . त्यानिमीत्य अखंड हरिनाम सोहळा व श्री तुकाराम महाराज गाथा पारायण आयोजीत केले आहे.
  
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ गाथा पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ प्रवचन, सायं. ६ ते ७ हरिपाठ,होणार आहे दर रोज रात्री ८.३० ते १०…३० हरी कीर्तन खालील प्रमाणे होणार आहेत.दि २२-३-२०२३ रोज बुधवार कीर्तनकार ह भ.प. त्र्यंबक अप्पा स्वामी नंदगांवकर दि. २३-३-२०२३ रोज गुरुवार कीर्तनकार ह.भ.प.विनोदाचार्य श्री चंद्रकांत महाराज लाठकर उस्माननगरकर ------
दि. २४-३-२०२३ रोज शुक्रवार कीर्तनकार ह.भ.प. श्री चैतन्य महाराज राऊत आळंदी  बालकिर्तनकार दि. २५-३-२०२३ रोज शनिवार कीर्तनकार शिवव्याख्याते ह.भ.प. कबीर महाराज आतार सिंहगड पूणे,दि.२६ मार्च रोजी रामयनाचार्य बाळू महाराज गिरगावकर दि. २७-३-२०२३ रोज सोमवार कीर्तनकार  विनोदाचार्य शिवा महाराज बावस्कर दि.२८-३-२०२३ रोज मंगळवार कीर्तनकार विशाल महाराज खोलेदि. २९-३-२०२३ रोज बुधवार ----- 

कीर्तनकार विनोदाचार्य अदीनाथ महाराज लाड दि.३०-३-२०२३ रोज गुरुवार १२ कीर्तनकार रामायणाचार्य श्री समाधान महाराज भोजेकर तर दि.३१ मार्च रोजी ह.भ.प.सोपान महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते १२ त्या नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे प्रमुख राजेश कुंटुरकर व ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments