Header Ads Widget

माळ इकळी येथे देशी दारू विक्री होत असल्याची चर्चा ? दारू बंदी अधिकाऱ्यानी लक्ष देतील का जनतेचा सवाल ""

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील माळ इकळी येथे विना परवानना देशी दारू विक्री होत असल्याची चर्चा होत असल्यामुळे बिलोलीचे दारू बंदी अधिकाऱ्यानी लक्ष देतील का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
माळ इकळी ही परबता महाराज यांची पवित्र भूमी असल्यामुळे या भूमीतच विना परवानगी देशी दारू विक्री होत असल्याने ते देशी दारू बंद करण्यात यावे अशी मागणी सप्ताहच्या निमित्ताने होत आहे
इकळीमाळ येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सप्त्याचा  कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होणार असल्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील व बाहेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार आहेत

देशी दारूमुळे तळी रामाचा त्रास भाविकांना होऊ नये यांची दक्षता गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे तालुक्यातील माळ इकळी येथे श्री संत परबतेश्वर महाराज यांची ४४ वी पुण्यतिथी, मुर्तीस्थापनेचा प्रथम वर्धापण दिन श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त मौजे ईकळीमाळ तालुका नायगांव जिल्हा नांदेड येथे दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढी पाडवा पासून अखंड हरिनाम सोहळ्याला सुरुवात होत आहे 

या ठिकाणी विना परवाना देशी दारू विक्री होत असल्याने तात्काळ दारू बंद करण्यात यावे अशी ही परिसरातील जनतेची मागणी होत आहे 

Post a Comment

0 Comments