Header Ads Widget

विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन घुंगराळा येथे अकरावी बारावी जिल्हा परिषद शाळेला मान्यता देण्यात यावी - वसंत पाटील सुगावे यांची मागणी !!

            माधव पवार
सन १९७७ ते १९७८ साली विद्यार्थ्यांची संख्या नसताना घुंगराळा येथे पहिली ते बारावी पर्यंत शाळा होती आता या ठिकाणी इयत्ता दहावी पर्यंत शाळा असून त्यांच्या संख्येत ही मोठी भरभराट झाली आहे

सदरचे गाव औद्योगिक वसाहत कृष्णुरच्या अंतर्गत येत असल्याने शासनाने या ठिकाणी इयत्ता अकरावी व बारावी शाळेला मान्यता द्यावी अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी केली आहे 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून मंत्र्यालया पर्यंत मागणी करणार असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे

नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या गावांची लोकसंख्या ही बऱ्याच पैकी असून येथे जिल्हा परिषद हायस्कूल इयत्ता दहावी पर्यंत असल्यामुळे या शाळेत शिक्षण घेण्यासाठी वंजारवाडी हिप्परगा निळेगव्हाण सावरखेड आदी गावचे विद्यार्थी शिक्षणासाठी घुंगराळा येथे येत आहेत 

 गेल्या ४५ वर्षाचा इतिहास पाहिला त्या काळात विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती परंतु पाहिली ते बारावी पर्यंत शाळा होती तत्कालीन राजकीय पुढाऱ्यानी सदरची शाळा इतरत्र हलविल्यामुळे घुंगराळा येथील अकरावी ते बारावी शाळा बंद करण्यात आली आहे

सध्याच्या परिस्थितीत घुंगराळा येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी नायगाव अथवा कुंटूर तांडा कुंटूर अगदी ठिकाणी जाऊन त्यांना अकरावीत प्रवेश घ्यावा लागत आहे 

परंतु या ठिकाणी अगोदर अकरावी ते बारावी पर्यंत शाळा होती विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी घुंगराळा येथे अकरावी ते बारावी शाळेची आवश्यकता असल्यामुळे शासनाने शाळेला तात्काळ मान्यता द्यावी असेही वसंत पाटील सुगावे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे 

त्यानुसार सदरच्या शाळेला मान्यता द्यावी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी वरिष्ठ पातळीवर करणार आहेत 

Post a Comment

0 Comments