नायगाव शहरातील मद्रेवार फॅमिली शाॅपला पार्कींगची सुविधा नसल्याने वाहतूकदारांची मोठी कोंडी होत आहे विशेष म्हणजे नायगाव नगर पंचायत अंतर्गत असलेल्या सदर बिल्डिंगला पार्कींग सुविधा असणे गरजेचे आहे
नायगावच्या नगर पंचायतीने या शाॅपला पार्कींगसह बांधकामांचा परवाना दिला आहे का ? दिला असेल तर सदर दुकान व बिल्डिंगच्या दर्जे नुसार पार्कींगसाठी पुरेपूर जागा असायला पाहिजे होती परंतु सदरच्या वाहतूक कोंडीमुळे पोलिसाची डोकेदुखी वाढणार का ?प्रश्न चर्चेला जात आहे
या ठिकाणी तसे दिसत नाही या उलटनायगाव ते नरसी हायवे रोडवर वाहने थांबत असल्याने वाहतूक दारांची मात्र चांगलीची चंगळ होताना दिसून येते आहे यात काय शंका नाही असे ही जनसामान्य माणसाला वाटत आहे
नायगाव नगरपंचायतच्या अंतर्गत असलेल्या मद्रेवार फॅमिली शाॅप हे नायगाव शहरात एक मोठे कापड दुकान असल्यामुळे त्या नुसारच ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु पार्कींग सुविधा नसल्याने नगर पंचायतच्या अधिकाऱ्यासह विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे
यामुळे वाहतूकदारांची मोठी कोंडी आणि आणि पोलीसाची मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर हा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल जनसामान्य माणसातून अशी मागणी केल्या जातो आहे

0 Comments