हिमायतनगर शहरात दिनांक १३ मार्च २०२३ रोजी अचानक पणे चौपाटी परिसरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर झालेल्या दोन गटात क्षुल्लक करणा वरुन थेट ग्रामीण रुग्णालयावर टोळक्यानी दगडफेक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे
त्या घटनेचे वास्तव चित्र असे की एका गटातील लोक मारहाण करून दवाखान्यात लपल्याचा भास झाल्या वरुन सदरची दगड फेक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे
हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय हे शासकीय असल्यामुळे या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गैरकायद्याच्या जमावातील एकूण ११ जणांसह इतर ४ ते ५ जना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जेमादार विजय आऊलवार यांनी सांगितले आहेशहरातील एका लग्न सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर
क्षुल्लक करणा वरुन दोन गटात दिनांक १३ मार्च २०२३ रोजी दुपारी अंदाजे साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान सदरची घटना घडली असून ठाण्याचे पोलीस अंमलदार नंदलाल भुरालाल चौधरी हे एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी रुग्णालय गेले होते
यावेळी लखन व्यंकटी गायकवाड, गोविंद चिमन्नाजी गायकवाड, अजय मेरटकर, पिराजी बेडके, संतोष गायकवाड, सिनु भुराजी पवार, लक्ष्मण चव्हाण, दादाराव चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय बाबूराव देवकर, शंकर चव्हाण आणि त्यांच्यासोबत इतर चार ते पाच जणांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे

0 Comments