जिल्हातील ऊस उत्पादक शेतक-यांनी विविध जातीचे ऊस लागवड करावी उस लागवड केल्यास कोणत्याही शेतक-याचे ऊस शिल्लक राहणार नाही यांची मी स्वता हमी घेईन असे गुरुजी उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवके गुरुजी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे
व्हीपीके उद्योग समुहातील एमव्हीके ऍग्रो फूड प्रॉडक्ट प्रा. ली. कुसूमनगर वाघलवाडा, डॉ शंकरराव चव्हाण जागरी अँड अँग्रो प्रॉडक्ट ली वाघलवाडा व व्हीपीके ऍग्रो फुड प्रॉ प्रा ली सिंधी या तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांना आवाहन करण्यात येते आहे
जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, जेवणे करून आमच्या कारखान्या अंतर्गत ऊस उत्पादक शेतक-यांसाठी ऊस विकास योजना जाहीर केले असून माहे फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऊस लागवड ऊस उत्पादक शेतक-यास एफआरपी पेक्षा ही जादा प्रती मे.टन १०० रुपये प्रोत्साहनपर भाव वाढ देण्याचे ठरवले आहे.
तसेच ज्या शेतकऱ्याकडे बेणे उपलब्ध नाही अशा शेतक-यांनी उधारी तत्वावर बिन व्याजी स्वरूपात हेक्टरी पाच मे.टन बेणे देण्याचे ही जाहीर केले.सदर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावे असे आवाहन शेतकरी नेते तथा कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले आहे.
तसे जिल्हयातील इतर कारखान्यांच्या नियोजन समितीने ऊस उत्पादक लागवड शेतक-यांसाठी विविध योजना आणून ऊस लागवडीसाठी नियोजन करावे. गावो-गाव बैठका घेऊन शेतक-यांचा ऊस घेऊन जाण्याची शाश्वती दयावी.तसे ऊस उत्पादक शेतकरी घाबरणार नाही. जिल्हात दरवर्षी शेतक-यावर सुलतानी संकटे येऊन तोंडाला आलेले इतर पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
माञ ऊस ह्या पिकाला संकटाचे नुकसान करु शकत नाही. त्यामुळेच जिल्हातील शेतकरी हतबल होऊ नये म्हणूनच शेतक-यांसाठी अनेक कारखाने ऊभारण्यात आले आहे.
प्रत्येक कारखान्यानी तसे नियोजन करून घ्यावे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.शेतक-यांची काळजी घेतली पाहिजे. इतर पिकावर अनेक संकटे येतात परंतु ऊस हे पिक कमी पाण्यात टिबंक पद्धतीने अजून लागवड केल्यास ऊस जोमाने परिपक्क होऊन उत्पादनात भर पडते. त्या ऊसाला एफआरपी चा दर वाढ होऊन भाव, ही चांगल्या पद्धतीने लागतो असे कवळे गुरुजी यांनी शेतकन्यांना आहावान करत आहे
त्यामध्ये शेतक-यांनी ऊस लागवड करतांना तसे कारखान्यांच्या शिफारशीत असलेल्या ऊस जातीचा वापर करावा जसे कि ८६०३२ व्हीएसआय ८००५,एमएस १०००१, कोसी ६७१ कोएम ०९०५७ सदर जातीचा ऊस लागवड शेतक-यांनी करावे असेही कवळे गुरूजी आहावान केले.

0 Comments