महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील सरकारी नियम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्व लक्ष्मी प्रभावाने लागू करावी यासह अन्य जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे
या संपात जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामसेविका ग्रामविकास अधिकारी सहभागी होणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन इ १३६ जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे पाटील व जिल्हा सरचिटणीस हनुमंत वाडेकर यांनी दिली आहे
राज्यातील सरकारी नियम सरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीचा जिल्हा परिषद व इतर सर्व विभागाच्या शासकीय कर्मचारी यांच्यावतीने राज्यस्तरावरील समन्वय समितीच्या वतीने पुढील प्रमाणे जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्या संदर्भात १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे
प्रमुख मागण्या नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्व लक्ष्मी प्रभावाने लागू करणे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती त्वरित करणे करुणा काळात मृत पावलेले कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना मर्यादित सूट देणे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करणे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एक स्तर वेतन वाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व एक स्तर वेतन लागू न केलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करण्यात यावी
संबंधित कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा कंत्राटी ग्रामसेवक यांना मिळणाऱ्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करून मानधनात वाढ करण्यात यावी राज्यातील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी इत्यादी सह अन्य प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका ग्रामविकास अधिकारी सहभागी होत आहेत
असे निवेदन जिल्हा प्रशासनास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने देण्यात आलेले आहे सदरील निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे जिल्हा मानदअध्यक्ष गोविंद माचनवाड जिल्हा कोषाध्यक्ष धम्मानंद धोत्रे शिवराज तांबोळी यांच्या सहीचे निवेदन आहे.

0 Comments