माधव पवार
सन १९८० साली विद्युत वितरण कंपनी घरगुती मीटर धारकाला ५० रुपयात कोठेशन देत होती त्यां नंतर कोठेशनचे दर कमी जास्त करण्यात आले असले तरी सन २०१० साली केवळ १५ रुपयात एका महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून ग्राहकाना मीटर देण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही अगोदर पासूनच घाट्यात असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची थकीत बाकी म्हणावी तशी होत नसल्याने या विभागातील अधिकारी सुद्धा हतबल झाले आहेत विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यासह नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तारावरची कसरत करावी लागत आहे
घरगुती विद्युत मीटर घेण्यासाठी आता मोजावे लागताहेत अडीच ते तीन हजार रुपये - शासन दरबारी आंधळं दळतंय कुत्र पीठ खातोय " घरगुती विद्युत मीटर घेण्यासाठी सवलत द्या महागडे मीटर नको असा सवाल ही जनतेनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने गेल्या वर्षीच ओपनसाठी १२०० रुपये कोठेशन करून मीटर देण्यात येत होते आणि मागासवर्गीय लोकांसाठी जात प्रमाणपत्र लावून ५६० ते ६६० इतक्या रक्कमेवर घरगुती मीटर धारकांना विद्युत वितरण कंपनीने मीटर देत होती परंतु २०२३ साली मात्र याच विद्युत कंपनीने आता नवीन नियम काढून घरगुती विद्युत मीटर घेण्यासाठी अडीच ते तीन हाजार रुपये कोठेशन भरून घेत आहे
एकीकडे कडे विद्युत मीटर घेत नसल्याने व दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे थकीत बिल वसुल होत नसल्याने या दोन्ही बाजूने सदरची विद्युत वितरण कंपनी अडचणीत सापडली असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी ही मोठ्या तोट्यात असल्याचे अनेक वेळा अधिकाऱ्यानी वसुली दरम्यान सांगितले आहे
या राज्यातील जन सामान्य नागरिक आता करायचा काय ? सरकार कोणत्याच बाबतीत सवलत ठेवली नसल्यामुळे नागरिक अगोदर महागाईने भाजून निघाली आता विद्युत वितरण कंपनी ग्राहाकाना कोठेशनच्या माध्यमातून चांगलाच चुना लावत असल्यामुळे घरगुती विद्युत मीटर घेण्यासाठी नागरिकांना परवडणार नसल्यामुळे मीटर घेण्यासाठी कोणी धजावत नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे

0 Comments