माधव पवार
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार राहुल गांधी यांची सुरतच्या न्यायालयाने खासदारकी रद्द केल्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून आक्रोश रास्ता रोको आंदोलनाचा आयोजन करण्यात येत असून केंद्र सरकारच्या अशा धोरणामुळे सदरचा पवित्रा घेतला असल्यामुळे नायगावच्या हेडगेवार चौकात दिनांक २७ मार्च २०२३ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे
गुजरात न्यायालयाने पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केले व दोन वर्षाची शिक्षा ही सुनावली असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात असल्याने राज्यात व ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रोश आंदोलनच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटीच्या व युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ जेलभरो आंदोलन करण्यात आले असून यावेळी श्रीनिवास चव्हाण, संजय बेळगे, विजय चव्हाण, सौ. मीनाताई कल्याण , शिवाजीराव धर्माधिकारी, प्रा.मनोहर पवार , बालाजीराव मदेवाड, सय्यद रहीम सेठ, ,पांडुरंग चव्हाण ,संजय चव्हाण, रवींद्र भालेराव ,शरद भालेराव, पंढरीनाथ भालेराव आदी वेळी उपस्थित होते
जेल भरो आंदोलनात काँग्रेस पक्षाचे माणिक चव्हाण, बालाजी पवार, साईनाथ चनावार, नवनाथ जाधव, भास्कर चव्हाण, बालाजी धोते, नरेश लांबदाडे, शेख अखिल राहेरकर, शिवाजी तिजारे, गजानन कल्याण, डॉ. शिवाजी कागडे, दत्ता इजतगावकर, शंकर गायकवाड,,काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ मंडळी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी युवक मंडळी आदींचा सहभाग होता. हजारो कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली होती, यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत काँग्रेस कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे
काँग्रेस नेते मा. खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आणि अदानीच्या विरोधात मोठया प्रमाणात आवाज उठवत असल्यामुळे या दरम्यान गुजरात न्यायालयाने एका प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची सज्जा सुनावली याच निकालाचा आधार घेत केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व सुद्धा रद्द केल्याने सदरच्या सरकाच्या निर्णयावर काँग्रेस माध्यमातून संतापाची लाट पसरली असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments