नायगाव तालुक्यातील राहेर गोदावरी पात्रातील अवैध रेतीचा उपासा करण्यात येत असल्याची तालुक्यात चर्चा होताना ऐकावयास मिळाल्यामुळे प्रभारी तहसीलदार निळे यांनी राहेर गोदावरी पात्राकडे नजर फिरवली आणि त्या संदर्भात चौकशी ही केली आहे
परत आले असल्याची चर्चा झाली मात्र कोणत्या तर एका अज्ञात खबऱ्यानी तहसीलदार राहेरकडे येत असल्याची माहिती दिली अन प्रभारी तहसीलदाराना रिकाम्या हाताने परत यावे लागले असल्याची ही चर्चा शोषियल मीडियावर पाहवयास मिळत आहे
तालुक्यातील राहेर भागातच नव्हे गोदावरीच्या पात्रा लगत असलेल्या काही गावांत सुद्धा रात्रीच्या वेळी अवैध रेतीचा उपसा होत असल्याचे गोपनीय माहिती मिळते सदरच्या अवैध रेतीच्या उत्खलन करणाऱ्यावर कारवाई उच्चीत असताना सुद्धा महसूल प्रशासनाचे पथक राहतो कुठे जातो कुठे यांची ही चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानी जाब विचारणे गरजेसचे आहे
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी हिंगोली येथील धान्य प्रकरणात गुंडाळले असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नायगावचे तहसील कार्यालय वाऱ्यावर ? असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे
गोदावरी पात्रातुन अवैध रित्या वाळूचा ? उपसा होतो त्यावेळी महसूल प्रशासन डोळे झाक करत असते आणि आपल्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अवैध रेतीचा उपसा सर्रास पणे होत असते यात काही शंका नाही असे चित्र दिसते आहे

0 Comments