माधव पवार
तंत्रज्ञानाच्या काळात अख्या देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी सरकारने फोन पे गुगल पेची सुविधा मोठ्या प्रमाणात तमाम नागरिकासह जनतेला मोबाईलच्या माध्यमातून करून दिल्या असल्यामुळे लाखो लोकांचा आर्थिक व्यवहार गुगल पे फोन पे वर अवलंबून असल्याने अनेक मोठ मोठाले व्यापारी या सुविधेचा सर्रास वापर करत आहेत
जनसामान्य माणूस फोन पे गुगल पेन चा वापर करत असूनही एकमेकांच्या फोन पे गुगल पे वर पैसे पाठवणे म्हणजे लाच होऊ शकते का ? जर होत असेल तर सदरच्या सुविधा बंद करणे आवश्यक वाटते असे अनेक प्रश्न ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे
ग्रामीण भागातील नागरिक व कर्मचारी यांच्यातील फरक तपासला तर बऱ्याच पैकी शासकीय कर्मचाऱ्यांनी फोन पे गुगल पेची सुविधा कारवाईच्या भीती पोटी सदरची सुविधा वापरत नाहीत कारण फोन पे वर गुगल पे वर आलेले पैसे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ? समजली जात असल्यामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांरी सदरच्या सुविधे पासून लांब राहत असल्याचे ग्रामीण भागातील स्पष्ट चित्र दिसून येत आहे
गुगल पे फोन पे मुळे पॉकीट मारीचे सुद्धा बऱ्याच पैकी प्रमाणात कमी झालेत आहेत पैशाचा धोका ही टळला गेला असला तरी माझ्या फोन पे वर पैसे ट्रन्सफर करा म्हणे गुन्हा ? ठरू शकतो का असे अनेक विषय चर्चेला जात असून जर गुगल पे व फोन फोन पे वर पैसे स्विकरणे गुन्हा असेल तर सरकारने या महत्वपूर्ण सुविधेला परवानगी दिलीच कशाला असा ही प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments