Header Ads Widget

मा. राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध करत नायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी येथील डॉ. हेडगेवार चौकात जेलभरो आंदोलन.


नांदेड / नायगाव :  एस एम मुदखेडकर - 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध करत नायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी येथील डॉ. हेडगेवार चौकात जेलभरो आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या; असंख्य कार्यकत्यांनी अटक करवून घेतली होती.

सुरत न्यायालयाने कांग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावबद्दल केलेल्या टीकेवरुन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काही तासांतच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. यावरुन देशभर काँग्रेसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी दि २७ मार्च रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील  नांदेड- नरसी या मुख्य रस्त्यावरील डॉ. हेडगेवार चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात माजी आ. वसंतराव चव्हाण  यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीच्या व युवक काँग्रेसच्या वतीने  केंद्र शासनाच्या निषेधार्थ जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीनिवास चव्हाण, संजय बेळगे, विजय चव्हाण, सौ. मीनाताई कल्याण ,  शिवाजीराव धर्माधिकारी, प्रा.मनोहर पवार , बालाजीराव मदेवाड, सय्यद रहीम सेठ, ,पांडुरंग चव्हाण ,संजय चव्हाण, रवींद्र भालेराव ,शरद भालेराव, पंढरीनाथ भालेराव ,

माणिक चव्हाण, बालाजी पवार, साईनाथ चनावार, नवनाथ जाधव, भास्कर चव्हाण, बालाजी धोते, नरेश लांबदाडे, शेख अखिल राहेरकर, शिवाजी तिजारे,  गजानन कल्याण, डॉ. शिवाजी कागडे, दत्ता इजतगावकर, शंकर गायकवाड,,काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ मंडळी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी युवक मंडळी आदींचा सहभाग होता. हजारो कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली होती, यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत काँग्रेस कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

Post a Comment

0 Comments