खरे तर राजकीय नेते मंडळीना मतदाराच्या माध्यमातून मौल्यवान मत दान केल्या जाते मतदान करीत असताना मतदार राजा कधीच जात पात न पाहता निस्वार्थपणे मतदान करून राज्याच्या महत्वपूर्ण गादीवर बसवतो त्यावेळेस जनतेसह मतदाराचा सन्मान करणे तितकेच लाभ दायक ठरते असे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाची अतिशय महत्वाची किमया असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे
पक्ष कोणता ही असो जनतेच्या माध्यमातून नेत्यांना दिलेली संधी ही विकासात्मक दृष्टिकोनाची असली पाहिजे जनतेला नेमके पाहिजे काय ? फक्त रस्ते पाणी लाईट या पेक्षा नेत्याकडे जनता कोणतीच अपेक्षा करू शकत नाही शेतकऱ्यांच्या सुखदुःखात व जनसामान्य माणसाची आपुलकी जपावी लागते असे ही होटाळकर यांनी सांगितले आहे
राजकारणातुनच विकासाला गती दिल्यास नेत्यांचा गौरव जनतेतुन केला जातो पण राजकारण आणि राजकारणातील भाष जनते पर्यत गेली तर जनता भल्या भल्याची वाट लावल्या शिवाय सोडणार नाहीत असे ही मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले व पुढे म्हणाले आहे
राजकारणातुनच विकास घडवून आणता येतो असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे

0 Comments