Header Ads Widget

जनसामान्य कार्यकर्त्यातून नेता निर्माण झाला पाहिजे माय बाप - भांडवलशाहीतून नाही - गजानन पाटील चव्हाण

      माधव पवार
राज्यात असो की देशात असो विविध पक्षात काम करत असलेले व सत्ता भोगणारी राजकीय नेते मंडळी ही जनसामान्य कार्यकर्त्यानुन निर्माण झालेले नेते नव्हेत हे भांडवल शाहितून निर्माण झाले आहेत माय बाप जन सामान्य कार्यकर्त्यातुन नेता निर्माण झाले पाहिजे असे मत गजानन चव्हाण यांनी नायागांव फास्ट न्यूजशी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे

तसेच गजानन चव्हाण यांनी मत व्यक्त करत असताना नायगाव विधानसभा मतदार संघा मध्ये राजकीय पिढ्या बाजूला ठेवण्यासाठी नायगाव मतदार संघातील मायबाप जनतेने मोडीत काढतील का ? आणि सामान्य कुटुंबातील कार्यकर्तातुन नेता घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हणाले आहे 

शहरी भागातला कार्यकर्ता असो की ग्रामीण भागातला कार्यकर्ता आपल्या नेत्याची बाजू भक्कम करीत असतो परंतु नेते मंडळीना कार्यकर्त्याचे काही देणे घेणे नसते निवडणूका आल्या तेव्हाच कार्यकर्त्याची आठवण येते आणि पाच वर्ष आपला सच्चा कार्यकर्ता काय करत यांचे नेत्याना बहाण नसते असे गजानन चव्हाण यांनी म्हटले आहे

राज्यातला  राजकीय नेता हा जन सामान्य माणसासह शेतकऱ्यांचा असला पाहिजे भांडवलदाराचा नको राज्यातली आजची परिस्थिती पाहिली तर राज्य राजकीय नेते मंडळीमुळे वेगळ्या दिशेने जाताना दिसत असल्याचे गजानन चव्हाण यांनी म्हटले या राज्यातल्या राज्यकर्त्याकडे जनता कोणत्या अपेक्षेने पाहावे तु कर रडल्यावाणी मी करतो मारल्यावाणी अशी गत गत राज्यात निर्माण झाली आहे 

Post a Comment

0 Comments