Header Ads Widget

पैनगंगा नदिवरील वाटेगाव कारखेड पुलास मंजुरी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतुद खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश - कारखेड येथे फटाक्याची आतिषबाजी !!

हिमायतनगर  : नागोराव शिंदे -

हिमायतनगर सह हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्याच्या कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर मोठा पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून गत अनेक दशका पासुन करण्यात येत होती याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे फडणविस सरकारने ५५ कोटी रूपयाच्या निधीस मंजुरी दिल्याने मराठवाडा विदर्भ तेलंगणा राज्याचा दळणवळणाचा मार्ग आनखी मजबुत होणार आहे.

उमरखेड महागाव तालुक्यातील बंदी भाग किनवट, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार असुन हिमायतनगर हदगाव ४५ किलोमीटर ऐवजी आता ३० किमी अंतर होणार असल्याचे सांगण्यात येते आहे 
हदगाव तालुक्यातील वाटेगाव आणि उमरखेड तालुक्याच्या कारखेड दरम्यान पैनगंगा नदी वाहते या नदीवर हरडफ बंधारा असला तरी पावसाळ्यात नदीला पाणी असतांना खरीपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिलक राहते परीणामी उमरखेड तालुक्यातील कारखेड देवसरी वाटेगाव खरूस या गावासह पंचक्रोशीतील नागरीकांना लाकडी तराफा व रूकावरून प्रवास करत हदगावला जावे लागते अथवा पन्नास किंमीचे अंतर कापत विडुळ - उमरखेड मार्गे हदगाव पोहचावे लागत आहे 

पैनगंगा नदी वरील पुलामुळे होणारी अडचण थांबवण्यासाठी हिंगोली खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला असे सांगण्यात येते पुलास मंजुरी मिळुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी सुद्धा प्रथम केली होती याबाबत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असला तरी त्या सोबत सन २०२३-२४ च्या अर्थ संकल्पात ५५ कोटी रूपयाची तरतूद करून घेतली असल्याचे समजते आहे

Post a Comment

0 Comments