Header Ads Widget

शासनानी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्या बरोबर अपंग व अंध लाभार्थ्यांना किमान दर महा पाच हाजार रुपये देण्याची मागणी

                माधव पवार 
महाराष्ट्र राज्यातल्या राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्या बरोबर अपंग व अंध लाभार्थ्यांना किमान दर महिन्याला ५००० हजार रुपये तरी देण्यात यावे अशी मागणी सदरच्या लाभार्थ्यातून होत असली तरी शासन या लाभार्थ्यांना तुटपुंजी मदत देऊन त्यांचे डोळे पुसतो आहे

सदरचे मानधन वाढावे म्हणून अनेक वेळा सदरच्या संघटनेच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात आले उपोषणे करण्यात आले परंतु शासन या गोरगरीबाच्या हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्याकडे कधी लक्ष देणार असे ही सदरच्या लाभार्थ्यातून बोलल्या जात आहे

या राज्यातील सत्तेचा दर पाच वर्षाला काया पालट होतो त्याच बरोबर मध्यंतर काळात सुद्धा सत्ता बदलते परंतु ह्या गोरगरीब लाभार्थ्यांच्या बाबतीत अथवा योजनेच्या बाबतीत एक ही रुपया वाढविला जात नसल्यामुळे लाभार्थ्यावर  उपासमारीची वेळ येत आहे 

अपंग लाभार्थी असो की अंध लाभार्थी असो अथवा विधवा महिलेच्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणारे तुटपुंजी मदत दर महिन्याला तर मिळतच नाही परंतु चार महिने पाच महिने संपल्याच्या नंतर ही पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याने सदरच्या लाभार्थ्यातून संताप व्यक्त केला जात आहे

या राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ह्या गोरगरीब जनतेच्या पोटाकडे व त्यांच्या परिस्थितीचा विचार करून तुटपुंजी मदत यांना पुरेशी होईल का ? यांची गांभीर्याने दखल गरजेचे आहे

शासनाने सदरच्या लाभार्थ्यांना किमान दर महा ५००० हाजार रुपये देऊन त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शासन निर्णय घ्यावा असे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून सदरील योजनेचा फायदा घेत असणाऱ्या लाभार्थ्यांनी राज्य सरकारकडे केली असल्यामुळे सरकारने ताबडतोब तोडगा काढून त्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांतून जोरदरीत आहे 



Post a Comment

0 Comments