Header Ads Widget

नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत वाढवा मीटकरे प्रवाशी मंडळाच्या वतीने हिंगोलीच्या विद्यमान खासदाराकडे मागणी

हिमायतनगर प्रतिनिधी  : नागोराव शिंदे 

हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असून येथील रेल्वे स्टेशन वरुन गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या काळात बंद असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत आतापर्यंत सुरू करण्यात आली नाही त्यामुळे नागपूर पर्यंत वाढवावी अशी मागणी  हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे

मुंबई नांदेड नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात होती परंतु कोरोणा च्या काळात बंद करण्यात आली असून ती गाडी अदीलाबाद पर्यंत जाते नागपूर ला न जाता परत अदीलाबाद वरूण मुंबई साठी रवाना होते
नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात नसल्याने प्रवाशांना नागपूर चंद्रपूर  देवीचे दर्शनासाठि जाण्यासा सोईचे होईल वर्धाला सेवाग्र हे रुग्णालयात रुग्णांना जाण्यासी सोईसकर होणार  आहे

 विदर्भातील ढाणकी उमरखेड महागाव बिटरगाव फुलसावंगी या भागातील जनतेला  हि रेल्वे सोयीची होती 

हि नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सदरच्या जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत वाढविण्यात यावी यासाठी ढाणकी येथील माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष  शेख इरफान  सचिव हिरासिह चव्हाण ठाकुर नाथा पाटील यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments