नायगाव तालुक्यातील मौजे गोधमगाव येथे गेल्या वीस दिवसा पासून या विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे या गावातील नागरिकांना पाणी टंचाई बरोबर अनेक समस्याना सामोरे जावे लाग असल्या सदरच्या अधिकाऱ्यानी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे
विद्युत वितरण कंपनी मांजरम युनिटचे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता पठाण यांनी असे सांगितले की गोदमगाव येथे दहा ट्रांसफार्मरस दिले आहेत या गावातून झिरो वसुली असताना सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहत आहोत
तालुक्यातील गोधमगाव येथे मांजरम युनिट अंतर्गत येते या गावातील डीपीचे ट्रान्सफर ना दुरुस्त असल्यामुळे हे संपूर्ण गाव काळोख्या अंधारात काढत असून या ठिकाणचा दळण वळणाचा ही प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे येथील नागरिक जवळच असलेल्या कोलंबी येथून ज्वारी गहू दळून आणत असल्याचे वास्तव चित्र पाहवायास मिळत आहे
मांजरम युनिट अंतर्गत असलेल्या गोधमगाव येथे गेल्या वीस ते पंचवीस दिवसा पासून विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत कोणतीच उपाय योजना करण्यात येत नसल्यामुळे येथील नागरिक चांगलेच वैतागून गेले व हतबल झाले असल्यामुळे या गावाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे या गावचा विद्युत पुरवठा कधी सुरु होईल असा प्रश्न चर्चेला जात आहे
या सदरच्या गावातून झिरो वसुली होत आहे घरगुती मीटर घेण्यास कोणी तयार नाही या गावातील जास्तीत जास्त ग्राहकानी जर घरगुती विद्युत मीटर घेऊन सहकार्य केल्यास कसल्याच प्रकारची कोणती ही परिस्थिती उद्भभवणार नाही आणि लाईट सुरळीत ठेवण्यासाठी सोपे होईल असे पठाण यांनी सांगितले आहे

0 Comments