नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर,नायगाव हिमायतनगर,व कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहिर झाली असून शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्यांच्याकडे सात-बारा आहे अश्या शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आहे राजकीय हालचालींना चांगलाच वेग येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
या निवडणुकीत ना महाविकास आघाडी होते का स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवितात की काय.? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गतवर्ष भरापासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया दि २७ मार्चला सुरु होणार आहे. दि २९ एप्रिलला मतदान होऊन दि ३० एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर नवनिर्वाचित संचालक मंडळ अस्थितवात येणार आहे. नामनिर्देशन दाखल करणे दि. २७ येणार आहे. सोमवार पासून सुरु होणार असून शेवटची फार्म भरण्याची दि ३ एप्रिल २०२३ रोजीतारीख आहे
नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी दि ३ एप्रिलला, छाननी दि ५ एप्रिलला वैध नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी दि ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख, तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप दि २१ एप्रिलला होईल तर दि ३० एप्रिलला मतमोजणी होईल.
सध्या तरी या निवडणुकीत काँग्रेस पक्ष वरचढ असून नांदेड,, भोकर, व नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे पारडे जड राहणार असल्याचे दिसून येते. तर हिमायतनगर व कुंटुर बाजार समितीत संमिश्र व नवखे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दिसते, पण कोण कसे कोणासोबत जुळवून घेतो यावर बाजार समितीच्या निवडणुकाचें भवितव्य अवलंबून आहे
धूर्त राजकारणी हे केव्हा कसे पत्ते उघडतात यावर राजकीय पक्षांच्या सह बरेच कांही अवलंबून असणारआहे. निवडणूक जाहीर होताच कार्यकत्यांची लगबग सुरू झाली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडी की काँग्रेस पक्ष स्वतंत्र राहील की नवीन भाजपा- सेना -युती कसे लढल्या जाते हे काही दिवसांत कळेल. यावेळी प्रथमच बाजार समितीच्या निवडणूकित तेलंगणातील बिआरएस पक्ष चर्चेत आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात बीआरएस पक्ष येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

0 Comments