Header Ads Widget

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेत अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार ?- २६ मार्च २०२३ रोजी होणा-या सभेला धर्माबाद तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे शंकर अण्णा धोंडगे यांचे आवाहन


धर्माबाद प्रतिनिधी : अनंतोजी कालिदास - 

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात बीआरएसचा प्रसार करण्यासाठी पक्षाकडून मुख्यमंत्री केसीआर यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे

येत्या २६ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा येथे केसीआर यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत बीआरएसमध्ये दिग्गज अनेक नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आज धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे छोटेखानी बैठकीत बोलत होते.

विकासाच्या तेलंगणा मॉडेलचे जनक भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी लोहा येथे दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना  दिली आहे 

यावेळी बोलताना माजी आ. धोंडगे म्हणाले की, सरकारच्या शेतकरी विरोधी व उदासीन धोरणामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी व तरूणवर्ग सध्या हैराण झाला आहे. पण शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार व मागासवर्गीय समाजासाठी राबविलेल्या धोरणांमुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे.

महाराष्ट्रातही तेलंगणाच्या धर्तीवर येथील समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संघटीत होऊन एकत्र यावे लागणार असल्याचे यावेळी धोंडगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले तेलंगणा मॉडेल कसे आहे, हे महाराष्ट्रातील येथील जनतेला माहित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे रविवार दि. २६:मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या सभेस एक लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित
राहतील असा विश्वास यावेळी धोंडगे यांनी तरी आपल्या धर्माबाद तालुक्यातुन देखील जास्तीत लोकांना के. चंद्रशेखर राव साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी घेऊन यावे असे आवाहन केले आहे 

तर नवीन पाटील बन्नाळीकर व धनराज पाटील बाभळीकर यांनी धर्माबाद तालुक्यातुन किमान दोन ते अडीच हजार कार्यकर्ते घेऊन आम्ही येथे असे आश्वासन दिले.यावेळी साहेबराव चव्हाण शंकर पाटिल सावळीकर ,नामदेवराव सोनकांबळे, यशवंतराव धानोरकर, गणेश पाटिल,सुरेश पाटिल येसगीकर, किशोर अक्कलोड -----------------------------------

जि.पी. मिसाळे सर,धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबूराव पाटिल आलूरकर युवा पत्रकार समिती अध्यक्ष भगवान  कांबळे पत्रकार माधव हणमंते, सुधाकर दादा जाधव, लक्ष्मण येताळे, रहिम खान, संजय झगडे , नागनाथ माळगे, लालाजी इमनेलु, दिनेश दारमोड, विजय सुर्यवंशी, मनोज कांबळे, शिवराज पाटील अथूब भाई जलील भाई,सह आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments