नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार -
या देशात लोकशाही चांगल्या प्रकारे नांदत असताना व लोकशाहीत वावरत असताना देशात एक वेगळेच चित्र दैनंदिन पाहावे लागत असले तरी या लोकशाहीच्या माध्यमातून जन सामान्य माणसाला न्याय मिळणार की अन्यायच होत राहणार असा ही प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे
भारतीय संविधानाच्या माध्यमातून या मायभूमीचा महत्त्वाचा नियम असल्यामुळे या देशात शासकीय शाळा असो की खाजगी शाळा असो या शाळेच्या माध्यमातून व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व शिक्षकांच्या माध्यमातून दररोज राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर शाळेत प्रार्थना घेतली जाते -
या प्रार्थनाच्या माध्यमातून भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नसलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे प्रार्थनेच्या माध्यमातून घेतल्या जाते परंतु या देशात बंधूत्व राहिलेच कुठे ? असे चित्र दिसून येत आहे

0 Comments