जिल्ह्यात व ग्रामीण भागात दिनांक २ मार्च २०२३ पासून दहावीची परीक्षा पूर्वी प्रमाणे नियमित स्वरूपात होणार असल्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षांच्या खडतर कालावधी नंतर गेल्या वर्षी ऑफलाइन स्वरूपात परीक्षा झाल्या होत्या यंदा पूर्वी प्रमाणे परीक्षा होणार असल्यामुळे दहावीच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील पाटील होटाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेला दिनांक २ मार्च २०२३ पासून प्रारंभ होत असल्यामुळे दहावी परीक्षा देणाऱ्या विध्यार्थीनी प्रश्न पत्रिकेतील दिलेले प्रश्न अगोदर नीट समजावून घेऊन अचूक पद्धतीने न घाबरता सोडविले पाहिजे मनात कोणती भीती न बाळगता विध्यार्थीनी कॉपीमुक्त मोहिमे अंतर्गत कॉपी मुक्त परीक्षा द्यावेत असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हटले आहेविध्यार्थीनी वर्षभर अभ्यास करून इयत्ता दहावी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत या परीक्षेसाठी मूल व मुली मोठया प्रमाणात परीक्षा देणार असल्यामुळे विध्यार्थीनी मनातली भीती बाजूला काढून सविस्तर पणे प्रश्न पत्रकेत दिल्या प्रश्नाचे उत्तर अचूक दयावेत असे ही माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी म्हटले आहे

0 Comments