देशाचे पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी यांनी जनसामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम हाती धरले की काय असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून सध्याच्या परिस्थितीत गॅसचे दर अतिशय मोठया प्रमाणात वाढवल्यामुळे खबरदार महागाडा गॅस घरी आणला तर असं सवाल सोभाग्यवतीने आपल्या पतीराजा करीत असल्याचे वास्तव चित्र आहेत
ग्रामीण भागातील महिलांच्या डोळ्याला लागणारा चुलीचा धूर काय करता कमी होत नसल्याने आता हर घर चुली म्हणण्याची वेळ महिला वर्गावर आली असल्यामुळे गँसकडे आता महिला वर्ग नाक डोळे मोडत आहेत
अगोदरच गॅसचा भडका भडकला होता आत्ता कसेबसे गोरगरीब लोक गॅसचा वापर करीत असल्याचे दिसून येत होते परंतु परत एकदा गँसचे दर वाढल्यामुळे महिलेसह जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी पासून जनतेला चांगलेच वेठीज धरले असल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात असून त्याच बरोबर कोरोना महामारीच्या नावाखाली सुद्धा जनसामाने माणूस भरडून गेला होता गॅस दरवाढीच्या भडक्यामुळे जनसामान्य माणसाची टाळूच भाजली असल्याचे ही ग्रामीण भागातील जनतेतून सवाल केला जात आहे
गॅस दर वाढवण्या पेक्षा जर शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव दिला असता तर अक्का देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले असते गॅसचा भडका व पेट्रोल डिझेलचे दर अतिशय गगनाला भिडत असल्यामुळे गोरगरीब जनता तुटभुंजी मंजुरी करून गॅस खरेदी करत आहेत
अगोदरच गोर गरीबाच्या हाताला रोजगार हमी योजनेचे कामे नाहीत लागेल त्या ठिकाणी काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांना गँसच्या कमी दराची लालूच दाखविली नंतर दरवाढीच्या भडक्यामुळे गोरगरीब जनता हताश झाले असल्याने केंद्र सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करून गॅस दर कमी करण्या ऐवजी गगनाला भिडवले असल्यामुळे जनता घोर सरकारवर नाराजी व्यक्त करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments