माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे ताकबीड येथील रहिवासी असलेला तरुण राजेश बालाजी गंगातिरे हा आपल्या कोणत्या तरी नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गोळेगाव जवळ नांदेड ते टेबर्णी या राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या धडकेत ठार झाला असल्याची दिनांक २७ मार्च २०२३ रोजी माहिती ताकबीड येथून मिळाली आहे
तालुक्यातील ताकबीड येथील मयत तरुण हा दिनांक २७ मार्च २०२३ रोजी आपल्या मोटार सायकल वरुन लग्न सोहळ्याच्या जात असताना वाटेतच गोळेगाव जवळ हा अपघात मोटार सायकल व राज्य परिवहन मंडळाच्या बसचा झाला असून या अपघात मध्ये ताकबीड येथील तरुण वय २४ वर्ष हा जागीच ठार झाला असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी घटनेचा पंचनामा केला आहे
उस्माननगर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जेमादार भारतीसह पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून सदरच्या अपघातील तरुणाचे प्रेत पोलीसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेल्याची सांगण्यात आले आहे
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोळेगाव ते मारतळा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच २० बी एल १६४९ व मोटार सायकल क्रमांक एम एच २६ बी आर १५३२ यांचा समोरासमोर जब्बर धडक लागल्यामुळे या अपघात ताकबीडचा तरुण राजेश बालाजी गंगातिरे हा जागीच ठार झाला असल्याची माहिती ठाण्याचे कर्तव्यदक्ष फौजदार के. पी. केंद्रे यांनी सांगितले आहे

0 Comments