Header Ads Widget

प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश एक दोन दिवसात दलित वस्तीसाठी सिग्नल फेजचे ट्रान्सफॉमर देणार - सहाय्यक अभियंता - जाधव -

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील दलित वस्ती गेल्या अनेक दिवसा पासून अंधारात असल्यामुळे माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायागांव येथील विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आले असता थेट अधिकाऱ्याशी बोलून सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली होती त्यानुसार कृष्णुर युनिटचे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता जाधव यांनी एक दोन दिवसात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे

तालुक्यातील रुई बु येथील नागरिकांनी सुद्धा आपली लाईट सुरळीत ठेवण्यासाठी व मार्च इंड असल्यामुळे मागील थकीत बिले भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे सांगत घरगुती विद्युत मीटर घेण्या करीता नागरिकानी समोर यावे व विद्युत वितरण कंपनी सोबत ग्राहकाचे नाते टिकून राहण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी रुई बु येथील दलित वस्तीच्या संदर्भात दखल घेऊन लवकर सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करून सहकार्य करावे असा महत्वाचा मुद्दा. प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण लावून धरल्यामुळे सहाय्यक अभियंता जाधव यांनी एका दिवसाचा अवधी द्या असे म्हणत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे

Post a Comment

0 Comments