Header Ads Widget

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशात घरासमोर सुंदर गुढी उभारुन साजरा केला जातोय !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

गुढीपाडवा हा सण सूर्योदया पूर्वी स्नान केल्याच्या नंतर विजयाचे प्रतीक म्हणून घरासमोर सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात धार्मिक मान्यते नुसार असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते

घरात सुख शांती आणि समृद्धी लाभते विशेष म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशात मोठया उत्साहात साजरा केला जातो भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे
महा पर्वाच्या अर्थात नव वर्षाच्या या पहिल्या दिवशी नूतन संकल्प करून प्रगती कडे वाटचाल करण्यासाठी करण्याचा व प्रयत्न करण्यासाठी हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतोय या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारतोय ही गुढी का ? उभारली जाते आहे
गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात ? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्याच्या नंतर वर विष्णू देवाची पूजा करतात? सर्व काही दडलंय या कथांमध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच पाहिजे 

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आज ही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे
शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले होते त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला होता मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला  अशी आख्यायिका सुद्धा आहे

या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जाते या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नव वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आज ही ग्रामीण भागात असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने हिमायतनगर तालुक्यामध्ये गुढीपाडवा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बळीराजांनी आपल्या सर्जा राजाची जोडी शेतामध्ये तास करण्याची पद्धत ही आज ही कायम असल्याचे स्पष्ट चित्र हिमायतनगर तालुक्यात  दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments