नायगाव मतदार संघातील व खेड्यापाड्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ त्यावर उपाय योजना कराव्यात अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला स्टेटमेंट दिले होते
त्या बातमीची दखल घेऊन नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी पाणी टंचाईचा आराखडा डेपोटी इंजिनियर कडे पाठवला आहे
सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचे कडक दिवस असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने अधिग्रहण करण्यासाठी आवाहाल मागून घेऊन ज्या ज्या गावात पाणीटंचाई होत असेल त्या गावांमध्ये प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मा. शिवराज पाटील म्हणाले होते
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात अशा पद्धतीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी ऑनलाइन बातमीच्या माध्यमातून प्रशासनाला सूचना केल्या होत्या --
नायगाव विधानसभा मतदार संघातील सर्वात प्रथम नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी दिनांक २४ मार्च २०२३ रोजी पाणी टंचाईच्या संदर्भातील आराखडा डेपोटी इंजिनियर कडे पाठवला आहे
सदरची ऑनलाईन बातमी ही दिनांक २३ मार्च २०२३ रोजी प्रकाशित झाली होती त्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने सदरचा पाणी टंचाईचा आराखडा तयार करून डिपोटी इंजीनियरला देण्यात आला व त्यांच्या कडून कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड यांना सादर करण्यात येणार असल्याचे ही कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी येणार वाजे यांनी सांगितले आहे

0 Comments