Header Ads Widget

कृष्णुर येथे ६५ वर्षीय कर्ज बाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना - पोलीस घटनास्थळी रवाना

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेले शेतकरी मयत व्यंकटराव अनाजी पाटील जाधव यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीमुळे झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान कृष्णूर येथे घडली आहे

कुंटूर ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील ६५ वर्षीय शेतकरी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी गावात पसरताच गावात शोक कळा पसरली असून सदरची घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याचे येथील गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी दुःख व्यक्त केले सदरचे प्रेत कुंटूर पोलीसानी ताब्यात घेऊन नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे समजते आहे 

तालुक्यातील कृष्णुर येथील रहिवासी असलेला शेतकरी हा आपल्या शेतातील गट क्रमांक १४७ मध्ये लिंबाच्या झाडाला शेतकरी व्यंकटराव अनाजी पाटील जाधव यांनी 
गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या अंगात धोतर, खमिश, गळ्यात पांढऱ्या रंगाची दस्ती होती असे वर्णन दिसून येत आहे

कृष्णुर येथील घटनेची  सदरची माहिती कुंटूर पोलिसांना कळताच ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार संतोष कुमरे पोॅ.का. अशोक घुमे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिणी करत पंचनामा केला असल्याची माहिती पॉ.का. घुमे यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments