Header Ads Widget

ग्रामीण भागात पाण्याच्या शोधात वानर सेना वन विभागाच्या अधिकाऱ्यानी उपाय योजना कराव्यात !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात तळ्याच्या पाण्याच्या ही पातळी खोलावर जात असल्यामुळे अन्य ठिकाणी रानात वास्तव्यास असलेल्या मुख्या प्राण्याला पाणी कुठेच मिळत नसल्यामुळे काळ्या तोंडाची माकड म्हणजे वानर सेना पाण्याच्या शोधात भटकताना दिसून येत असून या संदर्भात वन परीक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांनी काही तरी रानटी प्राण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे
तालुक्यातील सावरखेड व रुई बु घुंगराळा परिसरात सध्याच्या परिस्थितीत रानातील प्राण्याला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे हरीण वानर रान डुक्कर कोल्हे ससे घोरपडी कावळे पिंगळे घुबड शेळ्या मेंढ्या आदीना व रानातील मुख्या प्राण्याला पाणी मिळत नसल्यामुळे मेंढे पालपाळ सुद्धा आपले जनावरे घेऊन दोन ते तीन किलोमीटर पाण्याच्या शोधात जाताना दिसून येत आहेत
सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचा दुसराच महिना असला तरी रानातील जनावराना पाण्यासाठी भटकती करावी लागत असून अजून दोन महिने बाकी आहेत एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची तीव्र पाण्याची टंचाई भासणार असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यानी रानटी जनवरासाठी पानवते उपलब्ध करण्याची गरज असल्याचे ग्रामीण भागातील जनतेतून मागणी जोर धरित असली तरी ग्रामीण भागात पाण्याच्या शोधात वानर सेना वन विभागाच्या अधिकाऱ्यानी उपाय योजना कराव्यात असे ही जातेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments