Header Ads Widget

विकासात्मक धोरणा बरोबर संघटनात्मक बांधणीचा इतिहास रचविणार : शिवराज पाटील -

       माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक धोरणा बरोबर भाजपा पक्षांच्या संघटनात्मक बांधणीचा इतिहास रचून दाखवू असे मत भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिनांक १२ मार्च २०२३ रोजी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

भाजपा पक्ष आणि पक्षातील काही राजकीय पुढारी विकासाच्या मुद्द्यावर एक ही शब्द बोलत नसतात कुछ का मी बोलत असल्यामुळे भाजपा पक्षात वेगळी दुफळी निर्माण होत असून जनता वेगळ्या नजरेने पाहत असली तरी विकासात्मक धोरण डोळ्या समोर ठेवून येणाऱ्या काळात या नायगाव मतदार संघाला नक्कीच विकासाला गती मिळणार आहे

नायगाव मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत असताना सुद्धा या भागातील पुढारी सोशल मीडियाच्या माध्यमातून विकास करत असल्याच्या बाबतीत दर्शवितात परंतु विकास म्हणजे काय हा येथील नेत्याला कळला नसल्यानेचे शिवराज पाटील यांनी ठासून सांगितले आहे

नायगाव मतदार संघाचा व ग्रामीण भागाचा नुसता विकासराव जनतेला नको विकास करून दाखविला पाहिजे असे ही माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments