महोदय नामदार नितीन गडकरी साहेब " आता तुम्हीच सांगा " नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी तुमच्या कडे मागणी केलेल्या भायेगाव गोदावरी पुलाच्या बांधकामासाठी ६० कोठी रुपयाची मंजुरी दिली परंतु यश प्राप्त कोणाच्या मागणीला झाले हा चर्चेचा विषय बनला तरी मेहनत करी मुर्गी अंडे खाये फकीर अशी गत निर्माण झाली आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी सदरचा पूल मंजूर करण्यात यावा म्हणून नांदेड येथे मागणी केली होती आणि भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी सुद्धा नामदार नितीन गडकरी यांच्या कडे केली होती
सदरच्या पुल बांधकामासाठी ६० कोटी रुपये तात्काळ मंजुरी करण्यात आले असले तरी यात राजकीय मंडळी आता मीच मंजूर करून आणलो अशी मनात संकल्पना धरली परंतु या निधीचे श्रेय कोणाला जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
नायगाव तालुक्यासह उमरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भायेगाव गोदावरी पुलाच्या मंजुरीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार राजेश पवार व भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तुझा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केलेल्या मागणीचे श्रेय कोणाच्या बाजूने जाईल असा जनतेतून प्रश्न विचारला जात आहे
भारताचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक महामार्ग भारत सरकार नामदार नितीन गडकरी यांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी नांदेड येथे आले असता नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात व भायेगाव गोदावरीवर पुलाना तात्काळ मंजुरी द्यावी म्हणून नामदार नितीन गडकरी यांना विविध मागण्याचे निवेदन दिले होते

0 Comments